शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप
वैभववाडी (प्रतिनिधी): आज राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा पुन्हा नव्या उत्साहाने सुरू झाल्या. वैभववाडीत अर्जुन रावराणे विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी नुतन विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात व पुष्ष वृष्टी करत प्रशालेमार्फत जोरदार स्वागत करण्यात आले. संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वागत केले व सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तर प्रशालेच्या शिक्षिकांनी मुलांना औक्षण केले. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी नुतन विद्यार्थ्यांवर पुष्षवृष्टी करत प्रशालेच्या प्रांगणात त्यांचे जोरदार स्वागत केले. प्रशालेच्या वतीने विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक पाठ्यपुस्तकांचे देखील वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, पर्यवेक्षक पी.एम.पाटील., माध्यमिक विभाग प्रमुख सौ.एस.एस.पाटील., उच्च माध्यमिक विभाग प्रमुख पी.जे.सावंत., प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी व विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













