वरवडे सुपुत्र आ.नितेश राणेंचा वाढदिवस वरवडेत धुमधडाक्यात साजरा

शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप

कणकवली (प्रतिनिधी): वरवडे गावचे सुपुत्र कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस त्यांच्या मूळ गावी वरवडे येथे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वाभिमान प्रतिष्ठान च्या वतीने मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. आ.नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त वरवडे गावातील जिल्हा परिषदच्या हिवाळेवाडी शाळा, वरवडे 1 नं शाळा आणि फणसवाडी शाळेतील आणि अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या तसेच खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, वरवडे सरपंच करुणा घाडीगांवकर,स्वाभिमान प्रतिष्ठान चे अचित कदम, सुभाष मालंडकर, इब्राहिम शेख, शिवदास सादये,सीझर फर्नांडिस, अंकिता घाडीगांवकर,प्रदीप कदम, मंगेश तेली, भगवान मेस्त्री, सतीश मेस्त्री, सागर राणे, मंदार मेस्त्री, अक्षय राणे, शिंदे, प्रशांत गावडे, शिक्षक संतोष कांबळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. जिजाऊ फाउंडेशन च्या माध्यमातून माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत आणि स्वाभिमान प्रतिष्ठान च्या अयोजनातून हे वह्या आणि खाऊ वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!