कार्यकारी अभियंता सर्वगौड यांच्या हटके वर्किंग स्टाईल ची एकच चर्चाकणकवली (प्रतिनिधी) : पावसाळ्यात देवगड निपाणी या रस्त्यावरील पाण्याचा निचरा नीट होपावसाळ्यात देवगड निपाणी या रस्त्यावरील पाण्याचा निचरा नीट होतोय काय याची प्रत्यक्ष पाहणी करत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगौड यांना हडपीड येथील स्वामी समर्थ मठानजीक रस्त्यावर झाडाची फांदी तुटून पडलेली दिसली. कार्यकारी अभियंता सर्वगौड यांनी आपल्या शासकीय वाहनातून उतरत रस्त्यावर पडलेली झाडाची फांदी हटवून रस्ता वाहतुकीस मोकळा करून दिला. उप विभागीय अभियंता बासूतकर, कनिष्ठ अभियंता श्री नवपुते यांच्यासह कार्यकारी अभियंता सर्वगौड देवगड निपाणी रस्त्याची पाहणी करत होते.प्रवासात त्यांना हडपीड येथे वळणावर रस्त्यात झाडाची पडलेली फांदी दिसली.रस्त्यावर पडलेली ती फांदी वाहतुकीस अडथळा करणारी होतीच त्याशिवाय ऐन पावसात वळणाचा रस्ता असल्यामुळे अपघात होण्याचीही दाट शक्यता होती. कार्यकारी अभियंता सर्वगौड यांनी आपल्या पदाचा बडेजाव न करता वाहनचालक श्री. शैलेश कांबळे, श्री. अविनाश लाड , उपअभियंता बासुतकर व श्री. रवींद्र गोरुले यांच्या मदतीने ती फांदी दूर करून रस्त्यावरील अडथळा दूर केला. त्यांनी बजावलेल्या कर्तव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच स्वतः फिल्डवर उतरून हटके काम करण्याची कार्यकारी अभियंता सर्वगौड यांची स्टाइल पुन्हा चर्चेत आली आहे.तोय काय याची प्रत्यक्ष पाहणी करत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता .श्री. अजयकुमार सर्वगौड यांना हडपीड येथील स्वामी समर्थ मठानजीक रस्त्यावर झाडाची फांदी तुटून पडलेली दिसली. कार्यकारी अभियंता सर्वगौड यांनी आपल्या शासकीय वाहनातून उतरत रस्त्यावर पडलेली झाडाची फांदी हटवून रस्ता वाहतुकीस मोकळा करून दिला. उप विभागीय अभियंता बासूतकर, कनिष्ठ अभियंता श्री नवपुते यांच्यासह कार्यकारी अभियंता सर्वगौड देवगड निपाणी रस्त्याची पाहणी करत होते.प्रवासात त्यांना हडपीड येथे वळणावर रस्त्यात झाडाची पडलेली फांदी दिसली.रस्त्यावर पडलेली ती फांदी वाहतुकीस अडथळा करणारी होतीच त्याशिवाय ऐन पावसात वळणाचा रस्ता असल्यामुळे अपघात होण्याचीही दाट शक्यता होती. कार्यकारी अभियंता सर्वगौड यांनी आपल्या पदाचा बडेजाव न करता वाहनचालक श्री. शैलेश कांबळे, श्री. अविनाश लाड , उपअभियंता बासुतकर व श्री. रवींद्र गोरुले यांच्या मदतीने ती फांदी दूर करून रस्त्यावरील अडथळा दूर केला. त्यांनी बजावलेल्या कर्तव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच स्वतः फिल्डवर उतरून हटके काम करण्याची कार्यकारी अभियंता सर्वगौड यांची स्टाइल पुन्हा चर्चेत आली आहे.
रस्त्यावर पडलेली फांदी जेव्हा कार्यकारी अभियंता स्वतः हटवतात …












