लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच औचित्य साधून

गंगावेस श्री शाहू उद्यान इथे शाहू जयंती संपन्न

कोल्हापूर(प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेन राजर्षी शाहू महाराजांच्या नावान उभारलेल्या गंगावेस इथल्या श्री शाहू उद्यान इथं दरवर्षी शाहू जयंती आणि पुण्यतिथी संपन्न होते यावर्षी श्री शाहू जयंतीच औचित्य साधून महापालिकेचे कर्मचारी धर्मराज पाडळकर आणि उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांच्या पुढाकारातून शाहू जयंती चे आयोजन करण्यात आलं होतं. माजी नगरसेवक ईश्वर परमार यांच्या हस्ते छत्रपती शाहू राजांच्या पुतळ्याच पूजन करण्यात आलं. तसंच व्यावसायिक विकी महाडिक दादा, महापालिकेचे पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे यांच्या हस्ते राजर्षी शाहूंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. राजर्षी शाहू महाराज, जय भवानी जय शिवाजी या नामाचा जयघोष करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्यानात वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी लहू शिंदे,प्रा.अमित गुरव,अनिल पुरेकर सविता पाडळकर यांच्यासह शाहू उद्यान हास्य क्लबच्या ज्येष्ठ महिला, उद्यान विभागाचे कर्मचारी आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येन उपस्थित होते.

error: Content is protected !!