आचार (प्रतिनिधी): इंदिरा गांधी यांनी २५ जुन १९७५ ला देशावर लादलेल्या आणिबाणीला ४८ वर्षे पूर्ण होत आहेत. ज्या सत्तेसाठी इंदिरा गांधी यांनी आणिबाणी लादून लोकशाहीचा गळा घोटला त्याचा निषेध करण्यासाठी भाजपा वेंगुर्लेच्या वतीने काळे झेंडे फडकावले. इंदिरा गांधींनी आपल्या सत्तेला हादरा बसण्याच्या भयगंडाने पछाडून आणिबाणी लादली . १९७१ मध्ये प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या इंदराजींना महागाई, बेरोजगारी यासारखे प्रश्न हाताळता न आल्याने त्यांच्या विरुद्धचा असंतोष वाढु लागला होता. व या विरुद्ध देशात अनेक ठिकाणी आंदोलने होऊ लागली होती. याच पार्श्वभूमीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांची लोकसभेवरील निवड रद्द ठरविण्याचा निर्णय दिला. या निर्णयाने आपले राजकीय भवितव्य असुरक्षित वाटू लागल्यानेच इंदिरा गांधींनी आणिबाणी सारखे घातकी पाऊल उचलले. त्या काळ्याकुट्ट पर्वाला ४८ वर्षे पूर्ण झाली. त्याचा निषेध म्हणून भाजपा च्या वतीने काळे झेंडे फडकावले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण, वैद्यकीय आघाडी चे डॉ.अमेय देसाई, जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक – बाळा सावंत – वसंत तांडेल, ता.सरचिटनिस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर, अटल प्रतिष्ठान चे नकुल पार्सेकर, दादा केळुसकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, ता.चिटणीस समीर कुडाळकर व नितीन चव्हाण, विजय नाईक, सरपंच प्रणाली खानोलकर, उपसरपंच सुभाष खानोलकर, सुनील घाग, वसंत परब, शक्ती केंद्र प्रमुख सुधीर गावडे व शामसुंदर मुननकर, रविंद्र शिरसाठ, सुर्यकांत परब, आनंद परब, तात्या केळजी, ओंकार चव्हाण, सुनील सावंत, अजित राऊळ सर, भाऊ बागायतकर, बाबा राऊत, शिरगांवकर, प्रथमेश सावंत तसेच इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपा वेंगुर्लेच्या वतीने आणिबाणी दिवसाची आठवण म्हणून निषेधाचे काळे झेंडे फडकावले












