तारकर्ली-काळेथर ग्रा.प.सदस्य डाॅ.जितेंद्र केरकर यांचे जि.प. कार्यालय समोर बेमुदत उपोषण सुरू

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शासन निर्णय व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या व सभेचे इतिवृत्त देण्यास टाळाटाळ करणाऱ्या तारकर्ली काळेथर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच नियमबाह्य कामकाज सुरू असल्याबाबत वारंवार तक्रार देऊन तसेच उपोषण करूनही संबंधितांना पाठीशी घालणाऱ्या मालवण पंचायत समितीच्या सबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य डॉ जितेंद्र केरकर यांनी आज पासून पुन्हा जिल्हा परिषद कार्यालय समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

मालवण तालुक्यातील तारकर्ली काळेथर ग्रामपंचायत मध्ये नियमबाह्य कामकाज सुरू आहे. वरिष्ठ कार्यालयाचे आदेश तसेच शासन निर्णय यांचे पालन केले जात नाही. ग्रामपंचायत सदस्यांना विहित मासिक सभा झाल्यापासून आठ ते दहा दिवसात लेखी मागणी करूनही इतिवृत्त दिले जात नाही. इतिवृत्तासाठी पैसे भरना करण्याचे पत्र दिले जात आहे. वेळीच इतिवृत्त लिहिले जात नाही. अशी तक्रार तारकर्ली काळेथर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य डॉ जितेंद्र केरकर यांची आहे. याबाबत त्यांनी यापूर्वी अनेक वेळा आंदोलने, उपोषणे केली आहेत. ग्रामपंचायतीचे इतिवृत्त मिळवण्यासाठी उपोषण करावे लागत आहे. उपोषण केल्याशिवाय विद्यमान ग्रामपंचायत सदस्याला इतिवृत्त मिळत नाही ही शोकांतिका आहे. याबाबत तालुका व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही यामध्ये सुधारणा होत नाही तसेच सुनावणीला हजर राहत नाहीत. त्यामुळे सरपंच , ग्रामसेवक, आणि विस्तार अधिकारी यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याबाबत शिस्तभंगाची करवाई करावी या मागणीसाठी ग्राम पंचायत सदस्य केरकर यांनी जिल्हा परिषद प्रशासनाचे पुन्हा लक्ष वेधन्यासाठी आजपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

error: Content is protected !!