जिव्हाळा वृद्धाश्रमाला शिवसेना कुडाळ पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट

कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमात इयत्ता १० वी, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. सेवाश्रमाचे संस्थापक बिर्जे बंधू यांच्या दातृत्वातून याठिकाणी वृद्धाश्रमाचे कार्य अविरत चालत आहे.या वृद्धाश्रमात बिर्जे बंधू यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी वर्षा कुडाळकर (जिल्हा महिला आघाडी प्रमुख), योगेश तुळसकर (तालुकाप्रमुख), सिद्धी शिरसाट (महिला आघाडी तालुका प्रमुख), अरविंद करलकर उप तालुकाप्रमुख अरविंद करलकर, गडकरी (उप विभागप्रमुख) तसेच इतर शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वांनी बिर्जे बंधूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन निराधार वृद्धांची विचारपूस केली तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

error: Content is protected !!