उद्योजक महेश परब यांचे शैक्षणिक दातृत्व

धामापूर बौद्धवाडी प्राथमिक शाळेला दिली ३० हजार रुपये देणगी

चौके (प्रतिनिधी) : जि. प. प्राथमिक शाळा धामापूर बौध्दवाडी शाळेत स्वातंत्र्याचा 74 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी उपस्थित धामापूर गावातील उद्याजक तथा हॉटेल व्यावसायिक महेश परब यांनी शैक्षणिक मदत म्हणून बौद्धवाडी प्राथमिक शाळेसाठी ३० हजार रुपये रोख देणगी मुख्याध्यापक दिपक गोसावी यांच्याकडे सुपूर्द केली. तसेच यापुढेही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणार आणि एक मुलगी दत्तक घेऊन तिचा सर्व शैक्षणिक खर्च स्वतः उचलणार असल्याचे महेश परब यांनी यावेळी बोलताना सांगितले.

तत्पूर्वी सकाळी माजी सरपंच सप्तशिला धामापूरकर यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुलांनी संगीताच्या तालावर मानवी मनोरे करून सर्व मान्यवरांची वाहवा मिळवली. विविध देशभक्तीपर गीते मुलांनी गायली. त्यानंतर लोकांच्या उपस्थितीत प्रभातफेरी काढण्यात आली. तसेच बालदिना दिवशी झालेल्या विविध स्पर्धामधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

सायंकाळी बौद्धवाडी ग्रामस्थ आणि प्राथमिक शाळेच्या वतीने धामापूर ग्रामपंचायतीच्या विद्यमान नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच मानसी परब, उपसरपंच रमेश निवतकर, सदस्य स्वप्नील नाईक, प्रशांत गावडे, जयश्री थवी, तेजस्विनी भोसले, साक्षी नाईक, माजी सरपंच सप्तशीला धामपूरकर, विजयकुमार धामपूरकर, संदीप धामापूरकर, रवी कदम, संजय जाधव, विलास नाईक, ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समिती व आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

त्यानंतर महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला व त्यानंतर महिला तसेच आजी माजी विद्यार्थी यांचे विविध खेळ घेण्यात आले व विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. शाळेला मिळालेला आदर्श शाळा पुरस्कार व ज्या शिक्षकांमुळे शाळेने नावलौकिक प्राप्त केला आणि राज्याचे दोन आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक दिपक गोसावी यांचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!