डॉ. विलास गावडे यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार प्रदान

समर्थ सोशल फाउंडेशन, कोल्हापूर ने केले सन्मानित.

कुडाळ (अमोल गोसावी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आयुर्वेदतज्ञ डॉ. विलास गावडे यांना नुकताच समर्थ सोशल फाऊंडेशन व न्युट्रीफील हेल्थ प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमीटेड संचलित शिवशंभो निवासी व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत देण्यात येणारा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार रविवार २५ जून रोजी कोल्हापूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक सादिक शेख आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी विशेष सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देउन डॉ. विलास गावडे , यांचा कुटुंबीयांसह सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर समर्थ सोशल फाऊंडेशन चे संस्थापक सादिक शेख, कराडचे नायब तहसीलदार विजय माने, पंजाब नॅशनल बॅंक मेटलाइफ कोल्हापुर शाखा व्यवस्थापक नारायण पंवार, महिला आयोग जिल्हा समन्वयक आनंदा शिंदे,स्वामी वासुदेवानंद गिरी महाराज मध्यप्रदेश, सिनीयर विस्तार अधिकारी राजश्री गावडे. आदी मान्यवर उपस्थित होते.

समर्थ सोशल फाऊंडेशन व न्युट्रीफील हेल्थ प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमीटेड च्या व्यसनमुक्त व मधुमेहमुक्त भारत अभियानात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉ. विलास गावडे यांना संस्थेच्यावतीने वरील पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले.

error: Content is protected !!