कणकवली पेट्रोल पंपासमोर दुचाकी व टेम्पो मध्ये जोरदार धडक

दुचाकी स्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा महामार्गावर बस स्थानकानजिकच्या पेट्रोल पंपा समोर एका दुचाकी व टेम्पो मध्ये जोरदार धडक झाली. यात दुचाकी चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातात जखमी झालेल्या दुचाकी चालकाला कणकवलीतील एका खाजगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी तातडीने हलविण्यात आल्याची माहिती घटनास्थळावर बोलली जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की जेव्हा सदरचा दुचाकी चालक एम. एच. ०७ झेड ५१०० हा रस्ता क्रॉस करत असताना वागदेहुन पटवर्धन चौकाच्या दिशेने जाणारा टेम्पो एम. एच ०७ पी ८६६ जोरदार धडक बसली आणि दुचाकी चालक रस्त्यावर कोसळला.

अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस विनोद चव्हाण, होमगार्ड सुमित वारंग, उद्धव साबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

error: Content is protected !!