देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यात पडत असलेल्या संततधार पावसाने मोर्वे येथे घरात पाणी शिरल्यामुळे घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे तालुक्यात ११४ मिमी पावसाची नोंद झाली.
तालुक्यात पावसाचा जोर वाढत असून संततधार पावसाने बुधवारी सकाळी ५ वाजण्याचा सुमारास मोर्वे येथील सुमित्रा अर्जुन बापर्डेकर यांच्या घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. तालुक्यात बुधवारी सकाळी ११४ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले असून जनजीवनही विस्कळीत झाले आहे.













