भाजपा वेंगुर्ले च्या वतीने आषाढी एकादशी निमित्त ह.भ.प. कुर्ले महाराजांचा सत्कार
मोदींचा मोठेपण साऱ्या जगाने मान्य केला आहे-ह.भ. प. कुर्लेबुवा
वेंगुर्ला (प्रतिनिधी): आषाढी एकादशीच्या निमित्ताने 28 जून 2023 रोजी वेंगुर्ला तालुक्यातील ह. भ. प. कुर्लेबुवा आणि वारकरी संप्रदायातील मंडळींना शुभेच्छा देण्यासाठी चांदेरकर विठ्ठल मंदिर येथे भाजपा कार्यकर्त्ये एकत्रित जमले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहू येथे आवर्जून उपस्थित राहून महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या कार्याची प्रशंसा केली होती. त्याची आठवण करून देताना देसाई म्हणाले मोदीजींनी संत तुकोबांचा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा…. हा अभंग मराठीत म्हणून दाखवला होता व वारकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून कुर्लेबुवा यांचा निवृत्त शिक्षक व साहित्यिक अजित राऊळ यांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ह .भ . प .कुर्लेबुवांनी मोदीजींच्या कार्याचा व पक्षाचा मनापासून गौरव केला. साऱ्या जगाने मोदीजींचा मोठेपणा मान्य केला असून देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी त्यांनी करून दाखविले आहे. पुढील पंतप्रधान आहे तेच असतील यात शंका नाही अशी भविष्यवाणी त्यांच्या मुखातून बाहेर पडली. तसेच वारकर्यानसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी “विठ्ठल रुक्मिणी विमा छत्र योजना” सुरू केल्याबद्दल शिंदे – फडणवीस सरकारचे आभार व्यक्त केले. या निमित्ताने मंदिरात फराळाचे वाटप भाजपाच्या वतीने करण्यात आले. याचवेळी मोदीजींच्या नऊ वर्षांच्या कामगिरींचे पत्रक वारकर्याना देण्यात आली. यावेळी यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नगराध्यक्ष राजन गिरप व निवृत्त शिक्षक साहित्यिक अजित राऊळ , विश्व हिंदू परिषदेचे अरुण गोगटे, ता.सरचिटणिस बाबली वायंगणकर, नगरसेविका श्रेया मयेकर, महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर – रसीका मठकर – आकांक्षा परब, बुथ प्रमुख रविंद्र शिरसाठ व पुंडलिक हळदणकर, भाऊ केरकर, सुनील मठकर, राघवेंद्र जोशी इत्यादी कार्यकर्ते व सहदेव कुर्ले, अनिरुद्ध पेडणेकर, प्रमिला पाटकर, चंद्रभागा मेस्त्री, महानंदा मयेकर, रत्नप्रभा नागवेकर, चंदना कुर्ले, सुप्रीया बांदेकर, सायली मसुरकर, जोस्ना कुबल, रमाबाई तांडेल, राजन पवार, महेंद्र पालव, गजानन कुबल, दिपाली कुबल, रजनी तारी, मयुरी पालव, विठ्ठल वेंगुर्लेकर, शामा रेवणकर इत्यादी वारकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसन्ना देसाई यांनी केले.












