अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल चे नवोदय परीक्षेत यश

विद्यालयामार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे करण्यात आले अभिनंदन

वैभववाडी (प्रतिनिधी): भारत सरकारद्वारा व सीबीएसई बोर्ड मान्यता प्राप्त जवाहर नवोदय विद्यालय सांगली येथे इयत्ता ६ वी साठी जिल्ह्यातील ८० विद्यार्थ्यांची निवड झाली. नवोदय विद्यालय समितीमार्फत प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेत अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल च्या गार्गी बोडेकर, रिया माईणकर,करण गावडे या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर, पर्यवेक्षक पी एम पाटील‌, वर्ग शिक्षिका एस.ए.सबनिस यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, पर्यवेक्षक पी एम पाटील, प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी निवड झालेले विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

error: Content is protected !!