अमित यादव यांची कणकवली पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश एसपी अग्रवाल यांनी काढले असून कणकवली पोलीस निरीक्षक पदी अमित आनंदराव यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैभववाडी पोलीस निरीक्षक पदी कार्यरत असलेले अमित यादव तात्पुरते सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे कार्यरत आहेत.मितभाषी परंतु कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून अमित यादव ओळखले जातात.

error: Content is protected !!