मुंबई (ब्युरो न्युज) : मुंबई महापालिकेवर काढण्यात येणा-या मोर्चाआधीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय.. कारण आदित्य ठाकरेंचे विश्वासू अशी ओळख असलेले राहुल कनाल शिंदे गटात आज प्रवेश करणार आहेत.. राहुल कनाला हे युवासेना कार्यकारिणी सदस्य होते. तसंच आदित्य ठाकरेंचे अत्यंत विश्वासू समजले जात होता. महिनाभरापूर्वीच कनाल यांनी युवा सेनेचा व्हॉट्स अॅप ग्रुप सोडला होता.. त्यानंतर राहुल कनाल शिंदे गटात जात असल्याची चर्चा होती.













