माधवबाग च्या वतीने 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान विशेष ऑफर
हृदयाची कार्यक्षमता तपासण्यासाठी स्ट्रेस टेस्ट महत्वाची
कणकवली (प्रतिनिधी) : मानवी हृदयाची कार्यक्षमता तपासण्यासाठी स्ट्रेस टेस्ट गोल्ड स्टॅंडर्ड इन्व्हेस्टीगेशन आहे. माधवबाग च्या वतीने 4 हजार रुपये खर्चाची स्ट्रेस टेस्ट व रक्ततपासणी केवळ 999 रुपयांत 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान केली जाणार आहे. हृदयरोग ,ब्लडप्रेशर, मधुमेह, हाय कोलोस्ट्रोल, ब्लॉकेजीस, मानसिक ताणतणाव, लठ्ठपणा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, आणि बायपास केलेल्या रुग्णांसाठी या तपासणीचा मोठा फायदा होणार आहे. अँजिओप्लास्टी आणि बायपास नंतर मांसपेशींना रक्त पोहोचविण्यातील अडथळा दूर झाला की नाही हे स्ट्रेस टेस्ट मुळे समजते.आपल्या हृदयाची कार्यक्षमता समजते.ब्लॉकेजीस मुळे हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत सुरू आहे अथवा नाहीही समजते. माधवबाग च्या या विशेष शिबिरात कोलेस्टेरॉल साठी लिपिड प्रोफाइल ,डायबेटीज साठी Hba1c, थायरॉईड TCH, किडनी साठी Sr Creatinine टेस्ट केल्या जाणार आहेत. 4 हजार रुपये खर्चाच्या या टेस्ट केवळ 999 रुपयांत केल्या जाणार आहेत.यासाठी उपाशीपोटी सॅम्पल देणे आवश्यक असून आगाऊ नावनोंदणी साठी कणकवली मोबा.9373183888, कुडाळ मोबा.9011328581, सावंतवाडी मोबा.7774028185 येथे संपर्क साधावा.कणकवली व सावंतवाडी केंद्र दर सोमवारी बंद असते याची नोंद घ्यावी.











