ब्युरो न्युज (मुंबई) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा कोकण दौ-यावर निघणार आहेत.. 8 जुलै रोजी राज ठाकरे रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.. पक्ष बांधणीसाठी हा दौरा असल्याचं समजतंय… रत्नागिरी जिल्ह्यातल्या नवनिर्वाचीत पदाधिका-यांना राज ठाकरे मार्गदर्शन करतील.. तसंच जिल्हा बैठकाही घेणार असल्याची माहिती सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी दिलीय.











