श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान,चे आयोजन
कुडाळ (अमोल गोसावी ) : कुडाळ औदुंबर नगर येथील स्वामी समर्थ मंदिरात आज गुरुपौर्णिमा मोठ्या भक्तीभावात साजरी करण्यात आली. सकाळ पासूनच शेकडो स्वामी भक्तांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आज श्री स्वामी समर्थ मंदिरात सकाळी ८ वाजता मूर्तीवर अभिषेक , १० वाजता लघुरुद्र आणि इतर धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी श्री सामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रणजित देसाई यांनी सर्व स्वामीभक्तांना गुरुपौर्णिमे निमित्त शुभेच्छा दिल्या.












