मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीत बंडखोरी करून ज्या आमदारांनी शपथ घेतली त्या सर्व ९ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे याबाबतचे आदेश राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बजावले आहेत. पक्षात शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.
यात काल शपथ घेण्यात आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ,
धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, संजय बनसोडे, अनिल पाटील, आदिती तटकरे या नऊ मंत्र्यांचा समावेश आहे.












