चौके (अमोल गोसावी) : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचा ४० वा वर्धापनदिन आणि कृषिदिन यांचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक शाखा काळसेच्या वतीने शाखाधिकारी रवींद्र शिवगण यांच्या हस्ते बॅंकेच्या आवारात वृक्षारोपण आणि काळसे गावातील १० शेतकऱ्यांना काजू , सुपारी , आंबा या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी बॅंक कर्मचारी महादेव मलये , आनंद घाडी यांच्यासह के. बी. पवार , मनोहर काळसेकर , प्रसाद चव्हाण , प्राची चव्हाण , सुलोचना परब , श्रीकृष्ण भाटकर , सौ. भाटकर , जगदीश भोळे, सुरेश परब , आशिष परब , श्रीमती गावडे , आदि जण उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना शाखाधिकारी रवींद्र शिवगण यांनी जिल्हा बॅंकेचे नवनवीन उपक्रम आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध कर्ज योजनांची माहिती दिली.













