अजित पवार विधिमंडळ नेता
राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची घोषणा
5 जुलै रोजी पक्ष बैठीकीत होणार महत्वाच्या घोषणा
ब्युरो न्युज (मुंबई) : एकीकडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस मधून हकालपट्टी केल्याची घोषणा शरद पवार यांच्याकडून होत नाही तोवर राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करत सुनील तटकरेंची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत केली. अनिल पाटील यांची पक्ष प्रतोद पदी नियुक्ती करताना महाराष्ट्र विधिमंडळनेतेपदी अजित पवारांची निवड केल्याचेही पटेल म्हणाले. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडे आमदार आपत्रतेबाबत दिलेल्या अर्जाबाबत पटेल म्हणाले की जयंत पाटील यांनी तसे अर्ज दिले असले तरी ती वेळकाढू प्रक्रिया आहे. कोणाचीही अपात्रता होणार नाही. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेत संघटनात्मक बदल नूतन प्रदेशाध्यक्ष तटकरे करतील. 5 जुलै ला पक्ष बैठकीत याची घोषणा केली जाईल












