खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा नं.१ येथे गुरुपौर्णिमा शाळेचे उच्च श्रेणी मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिक्षका समवेत उस्ताहात साजरी केली.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्राप्ती कट्टी शाळेच्या पदवीधर शिक्षिका अर्चना तळगावकर,सहायक शिक्षिका रुपाली पारकर,रेखा लांघी,अलका मोरे,आरती जेजोन,अबिदा काझी व अमृता ब्रम्हदंडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाळेचे पालक दिलीप तळणेरकर यांनी शाळेला श्री विठ्ठल रुखमाई ची प्रतिमा भेट दिली.
शाळेच्या ईयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी गुरुौर्णिमेनिमित्त शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर यांचे पुषपगुच्छ देऊन गुरुपोर्णिमेचेच्या शुभेच्छा दिल्या तसेच त्यांचे प्रती ऋन व्यक्त करीत त्यांचे चरण स्पर्श करीत आशीर्वाद घेतले. “गुरू – शिष्याची ही परंपरा आपल्या देशाला विविध कालखंडात चालत आलेली असून आजतगायत अविरत चालत आलेली आहे.गुरुव शिष्य या नात्यातील अंतर कधीच कमी होत नाही.तर यातून मिळणारे संस्कार व ज्ञान त्याला अधिक घट्ट करत असतात.त्यामुळे विद्यार्थ्यांनी गुरूजनाबरोबरच आपले पहिले गुरू आई-वडील यांचा आदर करणे काळाची गरज आहे.असे भावपूर्ण उदगार शाळेचे मुख्यद्यापक प्रदीप श्रावणकर यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना काढले.
यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी यांनी देखील शाळेत येऊन आपल्याला शाळेत शिकविलेल्या शिक्षकांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेच्या शिक्षिका रेखा लांघी यांनी केले.
















