आळस झटकून कार्यरत व्हा, यश तुम्हाला मिळेल -प्रा.ए.डी.कांबळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

खारेपाटण (प्रतिनिधी): येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी वाङमय मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्यावतीने गुरू व्यास पौर्णिमेचे आयोजन नुकतेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. याप्रसंगी कला,वाणिज्य व विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आरती पवार,रोशनी लाड,हर्षाली सावंत अमृता जगताप या विद्यार्थीनींनी गुरूने दिला ज्ञानरुपी वसा हे गीत सादर करून कार्यक्रमाची छान सुरूवात केली .विद्यार्थ्यांमाधून राहूल कांबळे ,श्रुती पाटणकर,पुजा पोटफोडे,सायली सुतार,दिगंची तांबे,श्रावणी माने,पृथ्वीक सावंत ,अजय शेलार,सोनल कांबळे ,लतिका पोटले काजोल जाधव इत्यादींनी गुरूप्रति आपला आदर आपल्या मनोगतातुन व्यक्त केला .कुणाल पाटणकर व रमेश तोरस्कर या विद्यार्थ्यांनीही गीत गायन करून गुरूप्रती आदर व्यक्त केला . मराठी वाङमय प्रमुख प्रा.रश्मी देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी गुरू व्यासांची माहिती सांगून जीवनातील गुरूंचे महत्त्व अधोरेखित केले . प्रा.वसीम सय्यद सर यांनी जीवनात प्रत्येक जण गुरूच्या जागी असतो व आपण त्यांच्याकडून काही ना काही शिकत असतो असे प्रतिपादन केले.तर प्रा.माधवी पांचाळ यांनी निसर्गही आपला गुरू असतो व त्याच्याकडून अनेक गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत असे सांगितले .अध्यक्षिय मार्गदर्शनात प्राचार्य कांबळे सर यांनी गुरूचे जीवनातील महत्त्व सांगून आजच्या विद्यार्थ्यांनी आळस झटकून नेहमीच कार्यरत राहिले पाहिजे तरच यश मिळेल . गुरू हा मार्गदर्शक असतो त्याच्या मार्गदर्शनातुन विद्यार्थ्यांनी आपले जीवन ध्येय निश्चय केले पाहिजे व यशस्वी जीवनाची वाटचाल केली पाहिजे असे बहुमोल मार्गदर्शन केले .यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कक्ष प्रमुख प्रा.वसीम सर,मराठी विभागप्रमुख प्रा.रश्मी मॕडम, इतिहास विभागप्रमुख डाॕ.वंदना मॕडम,हिंदी विभाग प्रमुख प्रा गजानन सर,प्रा माधवी मॕडम,प्रा.मंगल मॕडम प्रा.नमीरा मॕडम , प्रा.सागर सर व प्रा.प्रज्योत सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार अपूर्वा खानविलकर हिने मानले व सुत्रसंचालन नम्रता बेलणेकर हिने केले .

error: Content is protected !!