जीवन आनंद संस्थेच्या पर्यावरण संवर्धन कार्याचा गौरव

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानव विकास संस्थेकडून संदिप परब यांना पुरस्कार प्रदान

खारेपाटण (प्रतिनिधी): नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानव विकास संस्थेच्या वतीने नुकतेच रस्त्यावरील निराधांचे पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या जीवन आनंद संस्थेचे संस्थापक सचिव संदिप परब यांना संस्थेच्या पर्यावरण संवर्धन विषयक कार्यासाठी पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी कुडाळ तालुका गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, परब मराठा समाज सिंधुदुर्ग जि.संघटक विनायक परब , अ.भा.यु.बँक सेना युनिअन (कोकण-कोल्हापूर व गोवा राज्य) उपाध्यक्ष गुरूदास गोविंद परब ,मांडकुली मा.सरपंच तुषार सामंत, सिंधुदुर्गमधील पर्यावरण प्रेमी डाँ.बापू आशोक भोगटे, परब मराठा समाज संघटक कुडाळ रामचंद्र परब, अध्यक्ष – धिरज परब मित्रमंडळ केरवडे धिरज परब, राजु मल्हार मित्र मंडळ केरवडेचे अध्यक्ष राजु मल्हार इ.मान्यवर उपस्थीत होते. जीवन आनंद संस्था रस्त्यावरील निराधार वंचित बांधवांच्या पुनर्वसनासाठी आश्रम आणि शेल्टर होमच्या माध्यमातून कार्य करीत आहे.या कार्याअंतर्गत चालणारे आश्रम आणि शेल्टर होम हे समाजाच्या पाठिंब्यावर चालतात.आणि म्हणून संस्था म्हणून आपण समाजचे देणे लागत असतो. ही भावना संस्थेचे कार्यकर्ते आणि आश्रमातील बांधवांमधे रूजविण्यासाठी जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदिप परब हे प्रयत्नशिल असतात. त्यांच्या याच भुमिकेतून प्रत्येक आश्रमच्या परिसरात नियमितपणे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमांचे आयोजनासह वृक्षारोपण व संवर्धन, जलसंवर्धन आदी उपक्रम संस्थेचे कार्यकर्ते, आश्रमातील उपचाराने बरे झालेले सक्षम बांधव व विद्यार्थ्यांच्या सहभागातून केले जातात. रस्त्यावरील निराधार मनोरूग्ण बांधवांवरिल उपचाराचा भाग म्हणून (थेरपी) शेती लागवड, पशु-पक्षी संवर्धन हे संस्थेच्या कै.सुप्रियाताई वेंगुर्लेकर पुनर्वसन केंद्र -अणाव व किन्लोस येथील सक्षम प्रकल्पा अंतर्गत केले जातात. संस्थेच्या या सर्व कार्याची दखल घेवून नैसर्गिक पर्वावरण संवर्धन व मानव विकास संस्थेच्या माध्यमातून संदिप परब यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

error: Content is protected !!