प्रवाहित वीज तारेच्या स्पर्शाने एकाचा मृत्यू ; माडा च्या झाडावरील नारळ काढताना दुर्घटना

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी मधील ख्रिश्चनवाडी येथील फीलिप फ्रान्सिस परेरा (वय ५३) यांचा आज झाडावरील नारळ काढत असताना विद्युत वाहिनीचा शॉक लागून मृत्यू झाला. सकाळी ९ वाजता ही दुर्दैवी घटना पिटढवळ नदी नजिक घडली. पिटढवळ नदी नजिक असलेल्या स्वतःच्या माडाच्या झाडावरील नारळ काढत असताना हा अपघात झाला. माडाच्या झाडावरून विद्युत वाहिनी गेलेली आहे. त्या वाहिनीचा प्रवाह सुरू असल्याने परेरा यांना शॉक लागला. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

error: Content is protected !!