उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देत केला सत्कार
कणकवली (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांचे आज मुंबई देवगिरी बंगाला येथे शाल व पुष्प गुच्छ देऊन राष्ट्रवादी नेते तथा मा नगरसेवक अबिद नाईक यांनी सत्कार करत अभिनंदन केले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अबिद नाईक यांनी कणकवलीत जल्लोष केला होता.त्यानंतर आज अजित पवार यांनी राष्ट्रवादी च्या संपूर्ण राज्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक बांद्रा येथे बोलावली आहे. यानिमित्त अजित पवार यांचा सत्कार अबिद नाईक यांनी केला.यावेळी राष्ट्रवादी प्रदेश चिटनीस सुरेश गवस, राष्ट्रवादी प्रांतिक सदयस्य सावलाराम अनावकर गुरूजी, राष्ट्रवादी प्रांतिक सदयस्य उदय भोसले, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष एम डी सावंत, राष्ट्रवादी कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर,कणकवली राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शैख़, कणकवली राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर,राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अमित केतकर, राष्ट्रवादी शहर सरचिटणीस गणेश चौगुले,राष्ट्रवादी माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी कणकवली माजी तालु का अध्यक्ष विलास गावकर,माजी राष्ट्रवादी ग्राहक सवरक्षण जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे,विलास पावसकर, राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेश महासचिव शफीक खान, केदार खोत,प्रवीण मोर्ये,आदि उपस्थित होते













