कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचा ६९वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचा ६९वा वर्धापनदिन, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, नीती आयोग भारत सरकार द्वारा प्राप्त अटल टिंकरिंग लॅबचा उद्घाटन समारंभ व प्रतिथयश मान्यवरांचा सत्कार समारंभ रविवार दिनांक ०९ जुलै २०२३ रोजी उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वैभव नाईक (आमदार, कुडाळ – मालवण मतदारसंघ) आणि तुकाराम रासम (चार्टर्ड अकाऊंटंट, सुझा रासम आणि कंपनी) लाभले होते. सदर कार्यक्रमाचे कार्यक्रमाध्यक्ष पद सतीश सावंत (अध्यक्ष, क.ग शि.प्र. मंडळ, मुंबई) यांनी भूषविले. सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाली. तद्नंतर वैभव नाईक आणि तुकाराम रासम यांच्या शुभहस्ते नीती आयोग भारत सरकार द्वारा प्राप्त अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमामध्ये इ. १०वी व १२वी परीक्षेमध्ये प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा, संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केलेल्या प्रशालेतील २ विद्यार्थ्यांचा आणि क्रीडा तसेच नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यानंतर प्रशालेचे माजी विद्यार्थी व प्रतिथयश व्यावसायिक बाळकृष्ण जगन्नाथ सावंत,शशांक मुकुंद बेळेकर तसेच. निलम कृष्णकांत कदम (कर्तव्यदक्ष पोलिस हवालदार) या प्रतिथयश मान्यवरांचा सत्कार वैभव नाईक आणि तुकाराम रासम यांच्या हस्ते करण्यात आला.

जीवनात यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षेची चांगली तयारी अभ्यास करा. जीवनात कोणीही बना ,पणं जे बनाल ते सर्वोत्तम बना असा मौलिक संदेश प्रमुख पाहुणे वैभव नाईक यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना दिला. तसेच कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेला शाळा विकाससाठी रू. ५ लाख आमदार निधीतून देण्याचे आश्वासन दिले.कितीही खडतर परिस्थिती समोर आली तरी डगमगून न जाता परिस्थितीवर मात करून यशस्वी व्हा असे मौलिक मार्गदर्शन प्रमुख तुकाराम रासम यांनी केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. आपल्याला लाभलेल्या उत्कृष्ट अध्यापकांकडून जास्तीत जास्त ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करा असे आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले.

सदर कार्यक्रमाला कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे उपाध्यक्ष पी. डी. सावंत, माजी जि. प. अध्यक्ष व संचालक सन्मा. श्री. संदेश उर्फ गोट्या सावंत व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समितीचे चेअरमन आर्. एच्. सावंत,खजिनदार गणपत सावंत व सर्व सदस्य, सांगवे सरपंच संजय सावंत, भिरवंडे सरपंच सुजाता सावंत, खलांतर-गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे व उपसरपंच बाळा सावंत, कुंभवडे सरपंच सूर्यकांत तावडे, हरकुळ बुद्रुक सोसायटी चेअरमन डॉ.आनंद ठाकूर, पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, पत्रकार तुषार सावंत, रत्नाकर सावंत, तुषार सावंत, प्रमोद सावंत,जयवंत सावंत, सुनिल सावंत, माजी प्राचार्य ए. एस. सावंत, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षकबयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी जगन्नाथ सावंत (सरचिटणीस, क.ग.शि.प्र. मंडळ, मुंबई यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक प्रसाद मसुरकर व पल्लवी हाटले यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित राहिल्या बद्दल सर्व मान्यवरांचे संस्थेचे उपाध्यक्ष पी.डी.सावंत यांनी आभार मानले.

error: Content is protected !!