कुडाळ तालुक्यातील गोवेरी भगतवाडी येथील दुर्घटना
सुदैवाने मोठा अनर्थ टळला
कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ तालुक्यातील गोवेरी भगतवाडी येथील लोखंडी साकव कोसळल्याने पाच जण जखमी. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली.
वाडीतील एका कार्यक्रमानिमित्त पाहुणेमंडळी येत होती काहीजण साकवावरून आले त्यानंतर काहीजण येत असताना साकव अचानक कोसळून माणसे पाण्यात पडली आणि एकच हाहाकार उडाला. त्यानंतर परिसरातील ग्रामस्थ धावले आणि पाण्यात पडलेल्याना सुखरूप बाहेर काढले. वीस पंचवीस वर्षांपूर्वीचा हा साकव होता वारंवार या साकवाची दुरुस्ती करावी अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी होती . मात्र त्याकडे संबंधित प्रशासन यंत्रणेने दुर्लक्ष केले आणि त्याची दुरुस्ती वर्षानुवर्ष तशीच राहिली. आज अचानक साकव कोसळून दुर्घटना घडली मात्र मोठा अनर्थ टळला त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.. जखमी ना वेंगुर्लाआणि कुडाळ येथील खाजगी रुग्णाणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.












