हिम्मत असल्यास पटवर्धन चौकात येऊन बोला, स्वतःच्या पायावर परत जाणार नाही
अजित पवार राष्ट्रवादी शहराध्यक्ष इम्रान शेख यांचा रुपेश जाधवाना इशारा
कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून काम करणाऱ्या अबिद नाईक यांनी काय केले हे विचारण्याचा अधिकार बाजार भूनग्यांना नाही. स्वार्थासाठी राष्ट्रवादीत येऊन कार्ड छापत चवली पावली गोळा करणाऱ्यांनी आमच्या नेत्यावर बोलण्याची हिंमत करु नये. तुमच्यात खरोखरच हिंमत असेल तर कणकवलीच्या पटवर्धन चौकात येऊन हे वक्तव्य करुन दाखवा मग तुम्ही स्वतःच्या पायांनी चालत जाता का ते पाहू असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस रुपेश जाधव यांना राष्ट्रवादी कणकवली शहर अध्यक्ष इम्रान शेख यांनी दिला आहे.
आमचे नेते अबिद नाईक हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून कार्यरत आहेत. राष्ट्रवादीच्या पडत्या काळात पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी दिली होती. युवकचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जे काम केले ते सर्वज्ञात आहे. त्यावेळी तुम्ही कुठे होता? दहा ठिकाणी फिरुन आल्यानंतर पतीव्रतेचा आव आणणाऱ्यांनी एकदा मागे वळून पहावे म्हणजे स्वतःची लायकी काय आहे ते त्यांना समजेल. अबिद नाईक हे राष्ट्रवादी नगरसेवक म्हणून निवडून आले व आजपर्यंत राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणूनच राहिले. ते राष्ट्रवादीचे सदस्य आहेत हे जिल्हाध्यक्षाला माहित नाही हे लपविणेचा खटाटोप करताना आपण काय बोलतोय याचे भान ठेवा. आमच्या नेत्यावर यापुढे अशाप्रकारची टिका केल्यास तुमची सगळी अंडी पिल्ले बाहेर काढू अशा इशाराही इम्रान शेख यांनी दिला आहे.











