चार दिवसात 35 गुरे दगावली ; शेतकऱ्यांवर संकट
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर गावात गेले चार दिवस अज्ञात आजाराने अनेक गुरे मरत आहेत. काल रात्री पर्यंत 19 गुरे मृत झाली होती. आज दुपार पर्यंत 25 गुरे दगावल्याचे वृत्त आहे. आज सकाळी गट विकास अधिकारी आप्पा साहेब गुजर, आमदार वैभव नाईक, आचरा सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल व्हटकर, जिल्ह्या बँकेचे अधिकारी यांनी शेतकर्यांची भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली. पशुवैद्यकिय अधिकारी डाँ. मिलिंद कांबळी,डाँ.वसंत सवादे, फाटक, तसेच सरपंच निकराचे प्रयत्न करीत आहेत.












