कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील इतिहासाचे अध्यापक डॉ. सोमनाथ दत्तात्रय कदम यांची मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत सदस्य म्हणून नुकतीच निवड झाली आहे.
मुंबई विद्यापीठ अंतर्गत सिनेट च्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यात बुक्टू प्राध्यापक संघटनेच्या वतीने प्रा. सोमनाथ कदम यांचा भरघोस मतांनी विजय झाला.
डॉ.सोमनाथ कदम यांना मुंबई विद्यापिठात कोकणचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ.राजश्री साळुंखे यांच्या हस्ते नुकताच कणकवली महाविद्यालय त्यांचा सत्कार करण्यात आला.
कणकवली महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे ,चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, संस्था पदाधिकारी, विश्वस्त,सदस्य, प्र. प्राचार्य युवराज महालिंगे, सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रा.कदम यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.