वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले गावचे सुपुत्र ऍड नंदन वेंगुर्लेकर यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर चया गव्हर्निंग कौन्सिल च्या स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. संस्थाध्यक्ष ललित गांधी यांनी लेखी पत्राद्वारे ऍड. नंदन वेंगुर्लेकर यांची निवड झाल्याचे कळवले आहे. ऍड. नंदन वेंगुर्लेकर हे समाजातील खालील विविध स्तरातील संघटनांवर कार्यरत आहेत. सचिव, आधार फाऊंडेशन सिंधुदूर्ग , उपाध्यक्ष, कर्मसिंधु प्रतिष्ठान, सिंधुदूर्ग , राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जिमनॅस्टिक असोसिएशन, महाराष्ट्र, संचालक, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी पतसंस्था, सिंधुदुर्ग, सदस्य, सिंधुदुर्ग जिल्हा चेस असोसिएशन, सिंधुदुर्ग, सचिव, सिंधुदुर्ग जिल्हा गॅस डीलर्स असोसिएशन, सिंधुदुर्ग, शाखा व्यवस्थापक, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, कोकण विभाग, समन्वयक, CRZ जिल्हास्तरीय समन्वय समिती, सिंधुदुर्ग, माजी चेअरमन व विद्यमान संचालक, सिंधुदूर्ग जिल्हा भंडारी सहकारी पतसंस्था मर्यादित, वेंगुर्ला, संस्थापक व सदस्य, कोस्टल बेल्ट डेव्हलपमेंट संस्था, सिंधुदूर्ग (NGO), संस्थापक व सदस्य, कोकण स्टुडंट युथ फेडरेशन,कोल्हापूर , संस्थापक व सदस्य, वेंगुर्ला तालुका स्पोर्टस वेलफेअर असो, वेंगुर्ला, अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा बीपीएड बेरोजगार संघटना, सिंधुदूर्ग , अध्यक्ष, वेंगुर्ला तालुका क्रिडा समन्वय समिती, वेंगुर्ला , सचिव, सिंधुदुर्ग जिल्हा खो खो असोसिएशन, सिंधुदुर्ग, सहसचिव, नगरवाचनालय, वेंगुर्ला, माजी सदस्य, तालुका क्रीडा संकुल समिती, वेंगुर्ला, सदस्य, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशन, महाराष्ट्र, माजी अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, सिंधुदुर्ग, सदस्य, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, सिंधुदुर्ग, उपाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशन, सिंधुदुर्ग,सदस्य, सिंधुदुर्ग जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशन, सिंधुदुर्ग. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स हा अत्यंत महत्वाच्या संस्थेवर निवड झाल्याबद्दल नंदन यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
ऍड.नंदन वेंगुर्लेकर यांची महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर च्या गव्हर्निंग कौन्सिल स्वीकृत सदस्यपदी निवड












