कुडाळ तहसीलदारांना निवेदन
कुडाळ (अमोल गोसावी) : चेंदवण-कवठी हा कुडाळ तालुक्यातील लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा गाव आहे. त्यामुळे नागरिकांची दररोजची महसूल विषयक कामे मोठ्या प्रमाणावर येत असतात. मात्र, पूर्ण वेळ तलाठी नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते. तरी ही गैरसोय टाळण्यासाठी चेंदवण-कवठी गावासाठी स्वतंत्र पूर्णवेळ तलाठी मिळावा, अशा मागणीचे निवेदन आज कुडाळ तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी ऋतुजा रुपेश खडपकर (उपसरपंच कवठी), रूपेश भास्कर वाडयेकर (माजी सरपंच), मंगेश दामोदर बांदेकर (उप विभागप्रमुख), रुपेश मधुकर खडपकर (युवासेना शाखाप्रमुख, संतोष दीनानाथ म्हापणकर, रुपेश पावसकर आदी उपस्थित होते.











