कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज बुधवार १४ ऑक्टोबर २०२६ शारदीय नवरात्र महोत्सव श्री शके १९४८ ची आजची चतुर्थी तिथी आजच्या तिथीला करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई अष्टमातृकांसह महासरस्वती अर्थात भगवती कात्यायनीच्या रूपात सजली आहे.
महिषासुराचा संहार झाल्यावर सर्व देवांनी देवीकडे वरदान मागितले की पुन्हा ज्या वेळेला एखाद्या दानवाचा आम्हाला त्रास देईल त्यावेळेला तू आमच्या सहाय्यासाठी धावून ये. याच वरदानाला अनुसरून शुंभ आणि निशुंभ नावाच्या दैत्यानी उपद्रव माजवल्यानंतर सर्व देव गंगा किनारी एकत्र येऊन देवीचे स्तवन करू लागले त्यावेळेला देवी पार्वती त्या ठिकाणी आली तिने त्यांना विचारले की तुम्ही कोणाचे स्तवन करत आहात त्यावेळेला पार्वतीच्या शरीरातून महा सरस्वती प्रगट झाली जिने हातामध्ये घंटा त्रिशूल नांगर शंख मुसळ चक्र धनुष्य बाण आणि कमळ धारण केले होते अशा अप्रतिम सौंदर्य खाणी असलेल्या जगदंबेच्या प्रागट्यानंतर पार्वती काली रूपात प्रगट झाली त्यावेळेला देवीच्या या सौंदर्याचं वर्णन चंडमुंड नावाच्या दैत्यांनी शुंभनिशुंभाकडे केले आणि त्यांना सांगितले की तुम्ही या स्त्रीबरोबर विवाह केला पाहिजे त्याप्रमाणे त्या स्त्रीला अर्थात देवीला आणण्यासाठी असुरांनी दूताला पाठवले. देवीने त्याला उलट पावली निरोप घेऊन पाठवले की जो पुरुष मला युद्धात जिंकेल त्याच्याशी विवाह करेन असा माझा पण आहे त्याप्रमाणे माझा निरोप कळवा. दैत्यानी हा निरोप ऐकल्यावर धूम्रलोचन नावाच्या राक्षसाला पाठवले तो केवळ देवीच्या हुंकाराने भस्म झाला त्यानंतर चंडमुंडाला पाठवले या दोघांना भगवती कालीने अर्थात चामुंडेने यमसदनाला पाठवले. यानंतर रक्तबीज नावाचा राक्षस आला त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून नवीन राक्षस तयार होत होता म्हणून देवीच्या सहाय्यासाठी प्रत्येक देवाची शक्ती मूर्तीमंत रूप घेऊन आली ब्रह्माची ब्रम्हाणी शंकराची माहेश्वरी कार्तिकेयाची कौमारी, इंद्राची इंद्राणी नरसिंहाची नारसिंही वराहाची वाराही विष्णूची वैष्णवी आणि शिवदूती चामुंडा अशा आठमातृका युद्धाला आल्या शेवटी महाकालीच्या मदतीने महा सरस्वतीने त्याचा नाश केला त्यानंतर निशुंभ आला निशुंभाचा वध झाल्यावर तू एकटी स्त्री आहेस असं सांगितलं होतंस पण एवढ्या सगळ्या जणी घेऊन तो युद्ध करत आहेस त्यावेळेला देवीने या सगळ्या मातृकांना स्वतःमध्ये सामावून घेतले याच रूपात आज जगदंबेची पूजा साकारली आहे.
देवीचे हे स्वरूप कात्यायन ऋषींच्या आश्रमात प्रगट झाले म्हणून तिला कात्यायनी असे नाव मिळाले ही भगवती कामदुर्गा कात्यायनी भक्तांच्या इच्छा पूर्ण करो हीच तिच्या चरणी प्रार्थना













