त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेच्या सुसज्ज पटांगणावर मालवण तालुका स्तरीय मैदानी स्पर्धा दिमाखात संपन्न

मालवण (प्रतिनिधी) : त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचालित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेच्या सुसज्ज पटांगणावर मालवण तालुका स्तरीय मैदानी स्पर्धा दिमाखात संपन्न झाल्या. क्रीडांगण विकास योजनेतून क्रिडा विभागाच्या वतीने त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे भव्य मैदान तयार करण्यात आले आहे. सदर मैदान मैदानी स्पर्धेसाठी तालुक्यात उपयुक्त असे मैदान आहे. त्यामुळे सातत्याने चार वर्षे या ठिकाणी मालवण तालुका स्तरीय मैदानी स्पर्धा क्रीडा समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात येतात. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबईचे सर्व पदाधिकारी, शालेय समिती, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती,सखी सावित्री समिती, माजी विद्यार्थी संघ,मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी विशेष मेहनत घेतात आणि त्यातून स्पर्धा नियोजन दर्जेदार होते. स्पर्धेचे उद्घाटन संस्थापक सदस्य श्री.चंद्रकांत गांवकर, पंचायत समिती सदस्य श्री.दिपक चव्हाण,शालेय समिती अध्यक्ष श्री .दशरथ घाडीगांवकर यांच्या हस्ते, शालेय समिती सदस्य श्री सुरेश गांवकर, श्री.कैलास घाडीगांवकर, श्री.सुहास चव्हाण, श्री.प्रवीण घाडीगांवकर,मुख्याध्यापक तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. वामन तर्फे, मालवण तालुका क्रीडा समिती सचिव तथा जिल्हा कास्ट्राईब संघटना अध्यक्ष श्री. संजय पेंडुरकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक पालक संघ सदस्य,क्रिडा विभाग प्रमुख श्री.सुभाष सावंत यांच्या शाळांचे प्रशिक्षक, प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, सर्व स्पर्धक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संस्था आणि प्रशालेच्या वतीने आणि मालवण तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांच्या वतीने क्रीडा समन्वय समिती सचिव श्री.संजय पेंडुरकर यांचा क्रीडा समन्वय समिती सचिव म्हणून निवड झाल्याबद्दल ह्दय सत्कार करण्यात आला. तसेच सर्व मान्यवर आणि क्रीडा शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला.या स्पर्धेत पहिल्या दिवशी एकूण 27शाळांमधील १७५स्पर्धकांनी सहभाग घेतला. तर दुसऱ्या दिवशी 28शाळांमधील २५०स्पर्धकांनी सहभाग घेतला. दुसऱ्या दिवसाच्या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.मार्क धर्माई, तालुका क्रीडा अधिकारी श्री.बाजीराव देसाई, श्री.सरेकर , शालेय समिती अध्यक्ष श्री.दशरथ घाडीगांवकर ,मुख्याध्यापक तथा जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष श्री वामन तर्फे, क्रीडा प्रमुख श्री सुभाष सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी रामगड हायस्कूल मुख्याध्यापक श्री.दिनेश सावंत, तालुका समन्वयक श्री संजय तेंडुलकर, श्री.महेंद्र वारंग,असरोंडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सुशांत पाटील, हिवाळे हायस्कूल मुख्याध्यापक श्री. पवार सर, कन्याशाळा मुख्याध्यापक श्री. शिंदे सर, काळसे हायस्कूल मुख्याध्यापक श्री.अविनाश परब यांच्या उपस्थितीत पार पडले. स्पर्धा यशस्वी पार पाडल्या बद्दल मुख्याध्यापक श्री. वामन तर्फे यांनी क्रीडा,समन्वय श्री.पेंडुरकर सरत्,यांचे सर्व सहकारी, क्रिडा शिक्षक, पंच, विद्यार्थी, शिरवंडे हायस्कूलचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व संस्था पदाधिकारी, शालेय समिती, सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, देणगीदार यांना धन्यवाद दिले.

error: Content is protected !!