मुंबई विद्यापीठ ५९ व्या युवा महोत्सवात कणकवली कॉलेजची अविस्मरणीय कामगिरी

नाट्य विभागात २ सुवर्ण, १ कांस्य व ३ उत्तेजनार्थ पदके संपादित

कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली कॉलेजच्या सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवातील अंतिम व विद्यापीठ स्तरीय फेरीत अविस्मरणीय यश संपादन केले आहे. मुंबई विद्यापीठ येथे पार पडलेल्या या स्पर्धेत कणकवली कॉलेजच्या विद्यार्थी कलाकारांनी विविध कलाप्रकारांत चमकदार कामगिरी केली.

या स्पर्धेमध्ये कणकवली कॉलेजच्या शुभम जाधव याने मिमिक्री (नकला) प्रकारात सुवर्ण पदक, तर नम्रता परुळेकर हिने एकपात्री अभिनय प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. तसेच मराठी प्रहसन कलाप्रकारात कांस्य पदक मिळाले. याशिवाय एकांकिका स्पर्धेअंतर्गत अभिनयासाठी शुभम जाधव व बुशरा बागवाण यांना उत्तेजनार्थ पारितोषिक, तर हिंदी प्रहसन कलाप्रकारासाठीही उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. हिंदी व मराठी प्रहसन या कलाप्रकारासाठी शुभम जाधव, नम्रता परुळेकर, मैथिली चाळके, अनुजा चाळके, ऐश्वर्या सावंत, संदीप सोनम, आयुष तांबे, प्रेम मिस्त्री, मयुरेश सातोसे व सुमित जाधव यांनी सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ, कणकवलीचे चेअरमन डॉ.अनंत नागवेकर, सचिव विजयकुमार वळंजू, विश्वस्त अनिलपंत डेगवेकर व सर्व संस्था पदाधिकारी आणि सदस्य यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांना या युवा महोत्सवासाठी प्राचार्य युवराज महालिंगे, सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ. सुरेश पाटील, सांस्कृतिक विभाग सदस्य डॉ.आशिष नाईक, डॉ. सुरेश हुसे, प्रा. सचिन दर्पे, डॉ. गीता कुणकवलेकर, प्रा. संदीप तेली, प्रा. सुकन्या तांबे, प्रा.मीनाक्षी सावंत, प्रा. प्रविण कडूकर, प्रा. विजय सावंत, प्रा. स्वीटी जाधव, लेखक आणि दिग्दर्शक सागर माने, प्रा. हरिभाऊ भिसे आणि अभिनेते निलेश पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सांस्कृतिक विभागाने मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!