सिंधुदुर्गात राष्ट्रवादी कॉंग्रेसची नव्याने उभारणी करणार – अबिद नाईक

कणकवली (प्रतिनिधी): उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सुचनेनवरून माझी जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पदी काका कुडाळकर यांची निवड होऊन देवगिरी बंगल्यावर यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सिंधुदुर्गात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नव्याने उभारणी करणार आहोत असे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मागील काही वर्षांत राष्ट्रवादी पक्षात गटतट राजकारण सुरू करून पक्ष संघटना निष्क्रिय करण्याचे काम सुरू होते. अजित पवार यांच्याकडे अर्थखाते असून त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात भरघोस विकासनिधी आणण्याचे काम करणार आहोत.राज्यात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी चे सरकार आहे. त्यामुळे केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री केसरकर, आमदार नितेश राणे यांच्याशी समन्वय ठेवून काम करणार आहोत. अजितदादा आजी तटकरे साहेब यांनी आम्हाला शब्द दिला आहे की तुम्ही काम करा तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. आठही तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन जिल्ह्यातील विकासकामांना गती देमर आहोत. मेळावे घेऊन आमच्यावर आरोप करणाऱ्यांना विकासकामांनी उत्तर देऊ. आमच्या कार्यकर्त्यांचा जेव्हा मेळावे घेऊ तेव्हा त्यांचे डोळे दिपतील असा टोला अबिद नाईक यांनी अमित सामंत याना लगावला.यावेळी दिलीप वरने, सावळाराम अणावकर, सुरेश गवस, उदय भोसले , सर्फराज नाईक, अशोक पवार, बाबू सावंत,विलास गावकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!