मालवण, सावंतवाडी मतदारसंघाची जबाबदारी कार्याध्यक्ष म्हणून माझ्यावर – काका कुडाळकर

कणकवली (प्रतिनिधी): अबिद नाईक आणि माझ्यात कुठलेही वाद नाहीत. मात्र पक्षाची नव्याने बांधणी करताना सर्वानुमते निर्णय व्हावा ही माझी विनंती प्रदेशाध्यक्ष तटकरे आणि जनरल सेक्रेटरी गर्जे यांनी मान्य केली आणि त्यानंतर काल 13 जुलै रोजी जिल्हाध्यक्षपदी अबिद नाईक व कार्याध्यक्ष म्हणून माझी निवड जाहीर केली आहे. माझ्यावर कुडाळ मालवण आणि सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ले या दोन मतदारसंघातील पक्ष संघटना बांधणीची जबाबदारी आणि कणकवली देवगड वैभववाडी या तीन तालुक्यांसह कणकवली विधानसभा मतदारसंघात पक्षसंघटना बांधणीची जबाबदारी अबिद नाईक यांच्यावर सोपवण्यात आली आहे.अजित पवार यांचे नेतृत्व महाराष्ट्र पुढे नेणारे आहे. राष्ट्रवादी चा मुख्यमंत्री अजित पवार यांच्या रूपातून व्हावा ही आम्हा कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

error: Content is protected !!