कणकवली (प्रतिनिधी): परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या शैक्षणिक मंडळामार्फत आयोजित पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर आयोजित मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ सोहळा रविवार 16 जुलै रोजी स. 9.30 वा. संस्थानच्या काशीभवन भक्तनिवास या सभागृहात होणार आहे. तहसीलदार आर.जे. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी संस्थानचे कार्यकारिणी सदस्य व शिक्षण प्रेमी उपस्थित राहणार आहेत. प्रवेश अर्ज भरून प्रवेश घेतलेल्या व प्रवेश घेवू इच्छिणार्या इयत्ता 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह उपस्थित रहावे. या शुभारंभ सोहळ्यास विद्यार्थी, पालक, शिक्षक यासह शिक्षणप्रेमी भक्तगणानी उपस्थित राहावे .असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत, सचिव अशोक सापळे, खजिनदार दादा नार्वेकर, विजय केळुसकार, व्यवस्थापक व शैक्षणिक मंडळ सदस्यांनी केले आहे.
भालचंद्र महाराज शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग उद्यापासून











