भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर आणि पंचायत समिती सदस्य दिपक सुर्वे यांचा विशेष प्रयत्न
आचरा (प्रतिनिधी) : चिंदर कुंभारवाडी सावित्री स्टॉप नजीक ट्रान्सफॉर्मर असलेले लोखंडी विद्युत पोल पडून जिवितहानी होऊ शकते याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनकडून समजतात भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, पंचायत समिती सदस्य दिपक सुर्वे यांनी आचरा विद्युत अभियंता यांच्याशी संपर्क करुन सदर पोल तात्काळ बदलण्यात यावे अशी आग्रही मागणी केली. तसेच पंचायत समिती सदस्य दिपक सुर्वे व सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर यांनी सदर ठिकाणी महावितरण अधिकार्यांसह पाहणी केली. यावेळी सदर अधिकारी गांवकर व ठेकेदार गोवेकर यांना पुढील धोका लक्षात आणून दिला. यांची दखल घेऊन महावितरणने काही दिवसात धोकादायक विद्युत पोल बदलले. सदर काम मार्गी लावल्यामुळे चिंदर कुंभारवाडी ग्रामस्थान मधून समाधान व्यक्त होत असून तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व दिपक सुर्वे यांचे आभार मानले जात आहेत.











