विविध स्पर्धा परीक्षांत गायत्री येणगेचे धवल यश

वैभववाडी (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी २०२३ घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वि.मं.कोकिसरे बांबरवाडी ता. वैभववाडी शाळेची गायत्री अमोल येनगे हिने राज्यात ६ वा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून सुयश संपादन केले आहे. तिला ३०० पैकी २८० मिळाले.
यापूर्वी केंद्रीय रक्षा मंत्रालयाच्या देखरेखीखाली चालणाऱ्या ऑल इंडिया सैनिक प्रवेश परीक्षेत सुद्धा पहिल्याच प्रयत्नात गायत्रीने ओबीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवून प्रवेश मिळवला आहे. त्याचबरोबर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सुद्धा विशेष प्रविण्यासह ती प्रवेशपात्र ठरली आहे.
अशाप्रकारे सन २०२२- २०२३ या शैक्षणिक वर्षात गायत्रीने हे तिहेरी यश संपादन केले आहे. तिला मुख्याध्यापक जयवंत मोरे, शिक्षिका गीता टक्के व पालकांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या या सुयशाबद्दल गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, विस्तार अधिकारी अशोक वडर, केंद्रप्रमुख गौतम तांबे, शाळा व्यवस्थापन समिती, सर्व ग्रामस्थ व मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!