कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, फोंडाघाट गांगोवाडी तालुका कणकवली या शाळेत कार्यरत असणारे. पदवीधर शिक्षक श्री विद्याधर लक्ष्मण तांबे यांची सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी मर्यादितवर सत्ताधारी असलेल्या भाग्यलक्ष्मी पॅनलच्या वतीने “तज्ञ संचालक” पदी सर्वानुमते निवड झाली.
विद्याधर तांबे यांना जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासह अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. अनेक सामाजिक धार्मिक संघटनांवर त्यांनी विविध पदावर काम केले आहे. सहकार क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. सह्याद्री सेंद्रिय बचत गट करुळ, स्वयंदिप शेतकरी गट कोंड्ये यातून शेतकऱ्यांशी त्यांचा संवाद व कार्य लक्षणीय आहे. रामेश्वर प्रासा. विकास सेवा सोसायटी करुळ,संस्थेमध्ये काम करून संस्थेला प्रगतीपथावर नेण्यात त्यांचे विशेष योगदान आहे. सध्या ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख सभा सिंधुदुर्ग तालुका कणकवली चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. भाग्यलक्ष्मी पॅनल मध्ये सहभागी करून काम करण्याची संधी दिल्याबद्दल, संघटनेच्या सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले.












