जनावरे बालबाल बचावली
कुडाळ ( अमोल गोसावी ): कुडाळ तालुक्यातील नेरूर देसाई वाडा येथील नारायण कृष्णा लिंगे यांच्या गोठ्यावर झाड कोसळून लिंगे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा प्रकार पहाटे ४ वाजता घडला. गोठ्यात जनावरे होती. लिंगे परिवार ला जाग येताच जनावरांना बाहेर काढून जनावरांना सुखरूप जागी हलविण्यात आले. त्यामुळे लिंगे यांची जनावरे बचावली. परंतु गोठ्याचे नुकसान झाले.













