चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी ! गौरी, गणपतीसाठी रेल्वे मार्गावर विशेष गाड्या

(ब्युरो न्यूज) : गणपतीसाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी.. कोकण रेल्वेच्या मार्गावर पश्चिम रेल्वेकडून 30 गणपती स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत. 14 ते 30 सप्टेंबरदरम्यान मुंबई सेंट्रल ते सावंतवाडीदरम्यान या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. आठवड्यातून 6 दिवस या गाड्या धावतील. मध्य रेल्वेनं आतापर्यंत 208 गणपती स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र तरिही अनेकांना आरक्षण मिळालेलं नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या या विशेष गाड्यांमुळे चाकरमान्यांना थोडा दिलासा मिळणार आहे. लवकरच या विशेष ट्रेनचं आरक्षण सुरु होणार आहे.

error: Content is protected !!