देवगड (प्रतिनिधी) : शेतमांगरात रात्री झोपण्यास गेलेल्या नारींग्रे बावकरवाडी येथील मंगेश शांताराम शिंदे (४५) याचा मृतदेह शेतमांगराजवळ असलेल्या वहाळाच्या पाण्यात आढळला.हा प्रकार मंगळवारी सकाळी ७ वा.सुमारास निदर्शनास आला. नारींग्रे बावकरवाडी येथील शांताराम शिंदे यांची नारींग्रे सडा गायगोठण या भागात शेतजमीन असून तेथे ते त्यांची दोन मुलांसमवेत शेती करतात.शेतजमीनीतच त्यांचा शेतमांगर आहे.मंगेश शांताराम शिंदे हा त्यांचा मुलगा हा नेहमी नारींग्रे सडा गायगोठण येथे असलेल्या त्यांच्या शेतमांगरात रात्री झोपायला जात असे. सोमवारी रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे ते शेतमांगरामध्ये झोपण्यास गेले होते.त्यांचे वडील शांताराम बापू शिंदे हे मंगळवारी सकाळी ७ वा.सुमारास शेतमांगराकडे मुलासाठी चहा व नाष्टा घेवून गेले.यावेळी तो शेतमांगरात दिसला नाही म्हणून मांगराजवळ असलेल्या वहाळाकडे गेला असेल म्हणून पाहण्यास गेले यावेळी वहाळाच्या पाण्यात त्यांना मृतावस्थेत दिसला.त्यांनी याबाबत तात्काळ गावातील ग्रामस्थांना सांगीतले.ग्रामस्थांच्या सहकार्याने पाण्यातून त्याला बाहेर काढण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला होता.मंगेश हा अविवाहित होता. या घटनेची खबर शांताराम qशदे यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली असून तपास पोलिस उपनिरिक्षक सुधीर कदम करीत आहेत.
वहाळात आढळला नारींग्रे येथील युवकाचा मृतदेह











