कळसुली दिंडवणेवाडी धरणाच्या पाण्यामुळे मठ कुडाळ पणदूर घोडगे वाहतूक बंद

वाहतूक पूर्ववत करा. माजी जि.प.सदस्य लॉरेन्स मान्येकर यांचे जिल्हाधिका-यांना निवेदन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कळसुली दिंडवणेवाडी धरणाच्या पाण्यामुळे मठ कुडाळ पणदूर घोडगेची वाहतूक गेले ६ दिवस बंद असल्याने शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलांसह नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. तरी या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत करण्याबाबत आदेश देण्यात यावेत. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य लॉरेन्स मान्येकर यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कणकवली येथील कळसुली दिंडवणेवाडी धरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. तसेच पर्यायी रस्ता पूर्ण झालेला नाही. तरी सदर धरणामध्ये बोटिंग साठी टेंडर प्रकिया करून बोटिंग व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. संबंधित धरणामध्ये पाण्याचा साठा करण्यात आला आहे.यामुळे मठ कुडाळ पणदूर ,घोडगे, हा रस्ता वाहतुकीसाठी गेले ६ दिवस पूर्णपणे बंद झाला आहे. पाण्याची पातळी कमी होत नसल्याबाबत संबंधित विभागाशी चौकशी केली असता धरणाचा गेट आम्ही मोठा करू शकत नाही असे सांगण्यात आले. संबंधित पाण्याचा विसर्ग होत नसल्याने पाणी तुबल्याने रस्ता बंद होऊन घोडगे, सोनवडे तर्फ कळसुली, भरणी, जांभवडे, कुपवडे या अतिदुर्गम भागातून कुडाळ,पणदूरला शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलांचे तसेच कुडाळला प्रशासकीय कामासाठी अन्य कामासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांची खूप मोठी गैरसोय झाली आहे. त्यांना प्रचंड आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याला जबाबदार असणाऱ्या व धरणाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच धरणाचे पाणी आडविणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच हा रस्ता रहदारीसाठी पूर्ववत करून नागरिकांची गैरसोय दूर करावी. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य लॉरेन्स मान्येकर यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी लॉरेन्स मान्येकर, जांभवडे सरपंच अमित मडव, चेतन ढवळ, प्रवीण दळवी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!