कुडाळ (अमोल गोसावी) : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून बुधवारी कुडाळ तालुक्यातील वालावल बाजारपेठ शाळेत गरजू मुलांना छत्र्यांचे वाटप केले. यावेळी ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर रवींद्र कावळे, सुनील नेरुरकर, गुरुनाथ वालावलकर, नागेश बंगे, दर्शना करवडकर, शिक्षिका सुष्मिता गोसावी, शिक्षिका प्राची रेवाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीक्षा गोवेकर, अंगणवाडी सेविका रोहिणी गोवेकर, मदतनीस सीमा चेंदवणकर आदी उपस्थित होते. यावेळी ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर म्हणाले की, आमदार वैभव नाईक हे गरजू मुलांच्या शिक्षणासाठी नेहमीच तत्पर आहेत . त्यासाठी मुलांनी सुद्धा अभ्यासावर लक्ष केंद्रित करून यश प्राप्त करावे असे त्यांनी म्हटले.













