सुवर्णकार संघटनेसह अनेकांची पोलिसात धाव
कणकवली (प्रतिनिधी) : कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिलेल्या माहितीवरून कर्नाटक पोलीस आज कणकवलीत दाखल झाले. या संशयिताने सांगितलेल्या माहितीनुसार कर्नाटक पोलिसांनी कणकवलीतील एका सुवर्णकारास मारहाण केल्याचा आरोप सुवर्णकारांनी केला आहे.त्यामुळे कणकवलीत पोलीस स्टेशनला वातावरण तणावपूर्ण बनले आहे. कणकवली शहरातील भालचंद्र महाराज आश्रमात हे सुवर्णकार आरती करण्याकरता थांबलेले असताना संशयीत आरोपीने दिलेल्या माहितीनुसार या सुवर्णकारास कर्नाटक पोलिसांनी थेट आरोपीच्या सारखी वागणूक देत ताब्यात घेतले असा आरोप त्या सुवर्णकार ने केला. दरम्यान त्या सुवर्णकाराला घेऊन कर्नाटक पोलीस कणकवली पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले असता कणकवलीतील सुवर्णकार संघटना तसेच माझी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांच्यासह अनेक कणकवलीतील नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. दरम्यान वागदे मध्ये घबाड सापडलेला ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून कणकवलीतील एकाकडे आटणीकरिता सोने आणले होते. व त्या वागदेतील गुन्ह्यातील संशयित आरोपी प्रकाश पाटील हे नाव सांगितल्याने संबंधित सुवर्णकारास ताब्यात घेतल्याचे कर्नाटक पोलिसांनी कणकवलीत पोलीस स्टेशनला माहिती दिली. मात्र यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले असून अनेकांनी कणकवली पोलिसात धाव घेतली आहे. कणकवली पोलीस स्टेशनला मोठा प्रमाणावर गर्दी झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे.












