खारेपाटण (प्रतिनिधी) : कोकणात गेली आठवडाभर सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून खारेपाटण गावात पूरजन्य परस्थिती निर्माण झाली आहे. तर खारेपाटणहून चिंचवलीकडे जाणारा रस्ता व खारेपाटण बाजारपेठेतून कालभैरव मंदिराकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला असून नागरिकांची वाहनांची रहदारी यामुळे थांबली आहे.
आज आलेल्या पुराच्या पाण्यामुळे विजयदुर्ग खाडी लगत असनाऱ्या गावामध्ये शेतकऱ्यांच्या भातशेती मध्ये पुराचे पाणी शिरले असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर खारेपाटण येथील शुकनदिने देखील धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी खारेपाटण गावात घुसले आहे.सद्या पडत असलेला पाऊस असाच पडत राहिल्यास नदीची पाण्याची पातळी वाढून खारेपाटण शहरात व बाजारपेठेत पुराचे पाणी घुसण्याची दाट शक्यता आहे. खबरदारी म्हणून खारेपाटण व्यापारी वर्गाने व नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर यांनी केले आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत असून आ खारेपाटण मध्ये पुराचे पाणी बिगे व भाटले आदी शेतमळ्यात गेले आहे.तसेच खारेपाटण घोडेपाथर बंदर व खारेपाटण हायस्कूल ते खारेपाटण बस स्थानक रस्त्यावर पुराचे पाणी येण्याची दाट शक्यता आहे.
असून वाहतूक मलातप्रमाण मोठ्या प्रमाणात चालू आहे.मात्र पूर येण्याची शक्यता कमी होती कारण नुकताच मे महिन्यामध्ये शुक नदीतील गाळ काढण्यात आला होता. परंतु जोरदार होत असलेल्या पर्जन्य वृष्टी मुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. खारेपाटण मध्ये दुपारी १२.०० वाजता पुराचे पाणी खारेपाटण मध्ये भरण्यास सुरवात झाली शनिवार आठवडा बाजार असल्यामुळे बाजारात गर्दी होती.मात्र खारेपाटण मध्ये पुराचे पाणी भरू लागताच ग्राहक व व्यापारी यांची एकच धांदल उडाली.




