वन महोत्सव निमित्त ग्रामपंचायत कुंभवडे आवारात वृक्षारोपण चा कार्यक्रम संपन्न

ग्रामपंचायत कुंभवडे व सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग परिक्षेत्र वैभववाडी यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग परिक्षेत्र वैभववाडी यांच्यावतीने विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण सिंधुदुर्ग वनक्षेत्रपाल वैभववाडी यांचे मार्गदर्शनाखाली आज दि . २७ रोजी वन महोत्सव निमित्त ग्रामपंचायत कुंभवडे आवारात वृक्षारोपण चा कार्यक्रम संपन्न झाला. सरपंच मिलिंद गुरव यांचे विशेष सहकार्य लाभले. ग्रामपंचायत परिसरात पिंपळ, वड, औदुंबर, बदाम, कोकम, आवळा, जांभूळ इत्यादी प्रकारची झाडे लावण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच मिलिंद गुरव,उपसरपंच विनोद कदम, पोलीस पाटील औदुंबर तळेकर, माजी सरपंच प्रमोद सावंत, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार शिंदे, चैताली चाळके, माजी सोसायटी चेअरमन बाळा तावडे, व्हा.चेअरमन जनार्दन शिंदे, महिला सदस्य , एकनाथ राऊत, रमेश राऊत, ग्रामसेवक बेळेकर, ग्रामपंचायत कर्मचारी पालांडे , गोसावी सर, इतर शिक्षक वर्ग, ग्रामस्थ तसेच वनपाल प्रकाश पाटील, वनरक्षक संदीप कुमार कुंभार ,विद्या जाधव ,तात्या ढवण आदी कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!